कास पठार : जैवविविधतेने नटलेले फुलांचे पठार - DigiGadgetsreview
SUBTOTAL :
कास पठार : जैवविविधतेने नटलेले फुलांचे पठार

कास पठार : जैवविविधतेने नटलेले फुलांचे पठार

Short Description:
कास पठार हे एक दुर्मिळ,वैविध्यपूर्ण, जैवविविधतेणें नटलेले अद्वितीय असे ठिकाण आहे. 850 पेक्षा जास्त दुर्मिळ,अति दुर्मिळ आणि अद्वितीय प्रजाती आहेत जी केवळ या पठारावर वाढतात. हे पठार पश्चिम घाटांमध्ये सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्याशी असून जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. कास पठार वर दूर दूर पर्यंत फक्त फुले सोंदर्याने नटलेली फुले दिसतात. असे वाटते की रंगरगेबी फुलांचा सडा पडला आहे.

DETAIL Description

कास पठार : फुलांचे पठार 
कास पठार हे एक दुर्मिळ,वैविध्यपूर्णजैवविविधतेणें नटलेले अद्वितीय असे ठिकाण आहे.

850 पेक्षा जास्त दुर्मिळ,अति दुर्मिळ आणि अद्वितीय प्रजाती आहेत जी केवळ या पठारावर वाढतात.
हे पठार पश्चिम घाटांमध्ये सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्याशी  असून जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
कास पठार वर दूर दूर पर्यंत फक्त फुले सोंदर्याने नटलेली फुले दिसतात.

असे वाटते की रंगरगेबी फुलांचा सडा पडला आहे.

Beautiful flowers of Kaas

view gallery for more photos
Kaas Pathar
Tooth brush orchid
Beautiful flower
Red terada
white flowers!
हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले.


कास पठार महाबळेश्वर टेबल लँड (plateau) चा विस्तार आहे. त्याची उंची सुमारे 3900 फूट आहे.

कास हे नाव  सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या जुन्या कास तलावामुळे मिळाले असा बोलले जाते.

कासा नावाच्या एका झाडांमुळे मिळाले असेही म्हटले जाते.



भेट देण्याची उत्तम वेळः
गस्ट ते सप्टेंबर दरम्यान भेट देण्याची उत्तम वेळ.
मौसमी पावसाच्या स्थिती वर फुलांचे येणे अवलंबून आहे.
पाऊस पडणे आणि तो त्या प्रमाणे थांबणे हे ही तितकेच महत्वाचे आहे कारण मॉन्सून थांबल्या नंतर फुले जोमाने येतात.
विशेष म्हणजे फुलांच्या आणि पावसाळ्याच्या प्रगतीवर हे पठार अक्षरशः दर आठवड्यात रंगाची छटा बदलते.


लाल तेराडा
कास पठारची निर्मिती :
कास पठार ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेले आहे.
संपूर्ण दख्खनचे पठार हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेले आहे
अभाळी
हे स्थान अद्वितीय का आहे:
समृद्ध जैव - विविधता, दुर्मिळ,अति दुर्मिळ आणि अद्वितीय प्रजाती आहेत जी केवळ या पठारावर वाढतात.
सुमारे 850 प्रजाती केवळ या पठारावर उगवतात आणि जगात कुठेही नाहीत. यामध्ये फक्त वनसंपत्ती नाहीत तर प्राणीच्या प्रजाती सुद्धा आहेत.

या पठारावरील बर्याच प्रजाती या विज्ञानाला नवीन आहेत.
या पठारावरील वनसंपत्ती वैज्ञानिक अभ्यासासाठी आणि संशोधनसाठी खुप उपयुक्त आहेत.
मिकी माउस
पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्तता :

बऱ्याच वनसंपत्तीया ओषधीं आहेत.
पृथ्वीवर असलेल्या पर्यावरणीय आणि जैविक उत्क्रांतीचे उत्तम उदाहरण आहे.
दुर्मिळ,अति दुर्मिळ असे  वनस्पती आणि प्राणी
विज्ञान आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत.




सोनकी
कोणत्या कारणामुळे अशी फुले फक्त इथे येतात :
हे पठार ज्वालामुखीच्या उद्रेकमुळे तयार झाले आहे.
त्यामुळे प्रामुख्याने दोन खडकान पासून बनलेले आहे  एक म्हणजे बॅसाल्ट आणि लेटिटिक खडक, जे पाणी धरून ठेवत नाही.
या पठारावर मातीचा पातळ थर आहे त्यावर केवळ पावसामध्ये फुले येतात.
नीलिमा

येथे वार्षिक सरासरी 2500-3000 मिमी पाऊस पडतो.
ज्वालामुखी मूळे निर्माण झालेला  बेसाल्ट रॉक, मातीचा पातळ थर आणि पाऊस यांच्या संयोजनमूळे पठारावर एक अद्वितीय पर्यावरण प्रणाली तयार झाली आहे,
म्हणूनच या प्रदेशातील वनस्पती आणि जीवजंतू अद्वितीय आणि जेवविधतेने नटलेले आहेत.


सीतेची आसवे

पठारची काही वैशिष्ट्ये :

विशेष म्हणजे काही फुलं फक्त सकाळी 7 ते 2 दरम्यान फुलतात.
अक्षरशः येथे फुलांच्या आणि पावसाच्या प्रगती नुसार  दर आठवड्याला फुलांच्या छटा बदलतात.
टोपाली कारवी सारखी काही फुलं दर 5 ते 6 वर्षांनी उमलतात.  2016 मध्ये उगवलेले टोपली करवी आता अंदाजे 2022 मध्ये उमळण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात लाल पाकळ्या असलेली पांढरी फुले केवळ 15 दिवसासाठी उमलतात.


कुमुदिनी तलाव 
ही फुलांची नसर्गिक साखळी आहे.


कुमुदिनी तलाव : 

संस्कृतमध्ये कुमुद म्हणजे कमळ जी फक्त  रात्री उमलतात 
म्हणून या तलावाला कुमुदिनी तलाव असे म्हणतात.
निसुरडी

जागतिक
वारसा स्थळ :
२०१२ मध्ये जेव्हा युनेस्कोने या पठाराला जागतिक वारसा हा  टॅग दिला होता तेव्हा हे एक छोटेसे ठिकाण  अचानक चर्चेत आले.
युनेस्को ने वेस्टर्न  घाट मधील घोषित केलेल्या 39 ठिकाणापैकी एक ठिकाण आहे.

युनेस्को  वैश्विकमूल्य असलेली नैसर्गिक किंवा ऐतिहासिक ठिकाणे जागतिक वारसा म्हणून घोषित करते.


याचा अर्थ कास पठार जगाला अनन्य साधारण असे नैसर्गिकमुल्य देते.
गेंद

लाल तेरडा

बेर्की


पठारावरची जैवविविधता :
यात 850 पेक्षा जास्त दुर्मिळ प्रजाती आहेत.
पठारामध्ये फुलांच्या 450 पेक्षा जास्त प्रजाती, पक्ष्यांच्या 30 प्रजाती, 10 ते 12 प्रकारच्या झाडाच्या प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 19 प्रजाती आहेत.

सेच फुलपाखरांच्या 32 प्रजाती आणि सस्तन प्राण्यांच्या 10 प्रजाती आहेत.
याशिवाय अनेक दुर्मिळ वन्यजीव,उभयचर,सरपटणारे प्राणी,कीटक आढळतात.

गुलाबी,पिवळ्या,जांभळ्या, लाल,निळ्या,पांढऱ्या अशा वेगवेगळ्या रंगाची फुले येतात.

मिकी माउससोनकी,अभाळी, सीतेचि आसवेगेंदतेरडा

कारवी,सोनसरी ,सोनतारा , निसुरडी,नीलिमा यासारखी फुले दिसतात.

तर प्राण्यांमध्ये ब्लू फॅन्सी नावाचे फुलपाखरु, फॅन ठोरटेड लिझरड,ब्लू रॉक तृश , मलबार क्रेस्टेड लाक्र यासारखे प्राणी आढळतात.



जैवविविधतेला असलेला धोका :

जागतिक वारसा टॅग असणे हा अभिमानाचा गोष्ट आहे परंतु हा टॅग फक्त  वैश्विकमूल्य म्हणून दिलेला नसून तर  या जागेचे जतन करणे, संरक्षण करणे, विशिष्टता राखून ठेवणे यासाठी
दिला आहे.
म्हणजेच हे दुर्मिळ ठिकानावरची जैवविविधता लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
850 प्रजाती 624 प्रजाती या अति दुर्मिळ प्रकारातील आहेत आणि 39 प्रजाती या  IUCN  रेड डेटा बुक लिस्ट मधल्या आहेत.
पर्यावरण वन मंत्रालय भारत सरकार  आणि
युनेस्कोच्या अहवालानुसार या प्रजाती लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
संवर्धनासाठी पर्यावरण वन मंत्रालय भारत सरकार सातारा फॉरेस्ट विभागाद्वारे प्रयत्न केले जात आहेत.

आययूसीएनएस रेड डेटा बुक यादीमध्ये 850 प्रजातींपैकी 624 या दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे. 39 प्रजाती या अति दुर्मिळ आहेत.

म्हणून ह्या वनस्पती धोकादायक (critically endangered ) प्रकारामध्ये येत आहेत.
.

 म्हणून जैवविविधतेचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

कास पठार नकाशा



ऑनलाईन बुकींग :


अधिकृत वेबसाइटवर जा : kas.ind.in



उपलब्ध वेळापत्रकानुसार तुमची भेट बुक करा.

आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या दरम्यान भेट देऊ शकता.

प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 100 रुपये आहे.

दररोज केवळ 3000 अभ्यागतांना परवानगी आहे.

कृपया शनिवारी आणि रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या भेटी टाळा.


एक सुजाण नागरिक म्हणून काही नियमांचे पालन कर :

ही प्रजाती फारच दुर्मिळ, सुंदर आहेत परंतु त्या धोक्यात आल्या आहेत म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून नामशेष होण्याचे टाळण्यासाठी आपण भेट देताना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी.


  • वनस्पतींवर चालू नका.
  • कोणतेही झाड तोडू नका कारण ही झाडे आपल्या  घरातील बागेत येणार नाहीत.
  • प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा टाकू  नका.
  • घटनास्थळी पोहचण्यासाठी वाहने वनविभागाच्या सुविधेचा वापर करा.
  • कृपया संध्याकाळी सहाच्या आधी जागा सोडा

3 Reviews: